*पाखरे…*
दूरदेशी उडती पाखरे,
ठाव त्यांचा कसा घ्यावा.
मोकळे हे आकाश सारे,
मोकळ्या होती त्यांच्या धावा.
नभाशी खेळण्या उंच जाती,
आवाज आता कसा द्यावा.
भिरभिरती, घिरट्या घालती,
कानात जाई मोकळीच हवा.
पंखात तयांच्या आले बळ,
कुठे कान्हा कुठे तो पावा.
मुख कमली फुलले गुलाब,
नव्हती लाली ना सुगंध यावा.
उंच उडुनी, घिरट्या घालुनी,
घरा परतताची ^मी पणा^ जावा.
कुशीत शिरता माय पित्याच्या,
आनंदाश्रून्ना मार्ग मोकळा व्हावा.
(दिपी)✒️
दीपक पटेकर.
८४४६७४३१९६.