You are currently viewing महाशिबिराच्या पार्श्वभूमीवर सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती स्वाती पाटील यांची आकाशवाणीवर मुलाखत

महाशिबिराच्या पार्श्वभूमीवर सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती स्वाती पाटील यांची आकाशवाणीवर मुलाखत

महाशिबिराच्या पार्श्वभूमीवर सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती स्वाती पाटील यांची आकाशवाणीवर मुलाखत

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांचेमार्फत मालवण येथे रविवार दिनांक ०१ मार्च २०२६ रोजी विधी सेवा, शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

        त्याअनुषंगाने डॉ. सुधीर देशपांडे, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती स्वाती जे पाटील ३रे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांची मुलाखत आकाशवाणीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दिनांक १८.०२.२०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजून ३० मिनीटांनी आकाशवाणी सिंधुदुर्ग एफ एम 103.6 मेगाहर्टझ / NewsOnAir अॅपवर प्रसारीत केली जाणार आहे. ही मुलाखत अॅड. श्रीमती प्रणिता कोटकर राऊळ यांनी घेतली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा