सत्यनारायण महापूजेनिमित्त दर्शन; शाल व श्रीफळ देऊन सत्कार
मालवण :
मालवण तालुक्यातील वराड गावातील श्री देव महापुरुष भंडारवाडी येथे जत्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी सत्यनारायण महापूजेनिमित्त उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले.
कार्यक्रमादरम्यान श्री. रुपेश पावसकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महापुरुष देवस्थानचे पदाधिकारी श्री. आनंद वराडकर, श्री. विद्याधर चिंदरकर, श्री. आबा सरमळकर, श्री. सुनील खोत, श्री. प्रमोद पावसकर, श्री. सिद्धेश वराडकर, श्री. नितीन नाईक, श्री. अमित सरंबळकर, सौ. रुद्रा पावसकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
