सावंतवाडीत मोफत एकदिवसीय बाल उपक्रम शिबिराचे आयोजन
सावंतवाडी
सावंतवाडी येथे लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक विशेष मोफत एकदिवसीय बाल उपक्रम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० या वेळेत पार पडणार आहे. ६ वर्षे व त्यावरील मुलांसाठी हे शिबिर खुले असून कालावधी दोन तासांचा आहे.
“Create • Learn • Play • Craft • Draw • Expression (निर्मिती • शिक्षण • खेळ • हस्तकला • चित्रकला • अभिव्यक्ती)” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात चित्रकला, हस्तकला, मजेदार खेळ तसेच शिकत-खेळत विविध सर्जनशील कृतींचा समावेश आहे. मुलांना स्वतःची अभिव्यक्ती मांडण्याची आणि कौशल्ये विकसित करण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे.
या शिबिराचे आयोजन DG Bandekar Trust यांच्या वतीने करण्यात आले असून कार्यक्रमाचे स्थळ B S Bandekar College of Fine Arts येथे आहे.
नोंदणीची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२६ असून जागा मर्यादित आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुक पालकांनी ७५८८१०९९० किंवा ९४०५८३०२८८ या क्रमांकावर संपर्क साधून लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
