You are currently viewing पतंजली स्थायी योगवर्गाचा विसावा वर्धापनदिन व समग्र योगोपचार शिबीर संपन्न

पतंजली स्थायी योगवर्गाचा विसावा वर्धापनदिन व समग्र योगोपचार शिबीर संपन्न

पतंजली स्थायी योगवर्गाचा विसावा वर्धापनदिन व समग्र योगोपचार शिबीर संपन्न

सावंतवाडी

पतंजली योग परिवाराच्या सावंतवाडी येथील स्थायी वर्गाचा विसावा वर्धापनदिन बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२० रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. वैश्यसमाज सावंतवाडी यांच्यासमवेत संयुक्त विद्यमाने वैश्यभवन, सावंतवाडी या ठिकाणी संपन्न झालेल्या या वर्धापनदिन सोहळ्यामध्ये ऐशीहून अधिक योगसाधकांनी उपस्थिती दर्शविली. या वर्धापनदिनानिमित्त पाच दिवशीय समग्र योगोपचार शिबीरसुद्धा संपन्न झाले.
यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष ॲडव्होकेट अनिल निरवडेकर, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी विद्याधर पाटणकर, भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हा प्रभारी डॉक्टर तुळशीराम रावराणे, वैश्यभवनचे संचालक तथा वैश्यसमाज पतपेढीचे चेअरमन रमेश बोंद्रे, भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हा पूर्वप्रभारी महेश भाट, भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय, सावंतवाडी समितीचे सदस्य बाळ बोर्डेकर, पतंजली योग समिती समन्वयक विकास गोवेकर, पतंजली परिवाराचे जिल्हा महामंत्री विकास केरकर, पतंजली किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी रविंद्र पावसकर, पतंजली योग समिती सावंतवाडी तहसील प्रभारी बाबली गवंडे, महिला पतंजली तहसील प्रभारी निर्मलाताई कडोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ॲडव्होकेट अनिल निरवडेकर यांनी पहाटे-पहाटेच जिल्हाभरातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या योगसाधकांचे कौतुक केले, तसेच लवकरच दीड ते दोन वर्षभरात नगरपरिषदेचे अद्दयावत योगकेंद्र उभारले जाईल आणि गेली वीस वर्षे पतंजलीमार्फत ही योगचळवळ निरंतर कार्यरत आहे, त्याची पोचपावती म्हणून यापुढे जेवढी योगशिबिरे होतील, त्या सर्व योगशिबिरांकरीता हे योगकेंद्र उपलब्ध करुन दिले जाईल, याची ग्वाही दिली.
यावेळी रमेश बोन्द्रे यांनीही मनोगत व्यक्त केले तर डॉ. तुळशीराम रावराणे यांनी योगशिबिराला नियमितपणे आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल सर्व योगसाधकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विकास गोवेकर यांनी योगशिक्षकांनी योगवर्ग घेताना प्राणायामवर जास्तीतजास्त भर देण्याचे आवाहन केले तर विद्याधर पाटणकर योगकेंद्र उपलब्ध करुन देण्याविषयी आश्वासीत केल्याबद्दल प्रभारी नगराध्यक्षांचे आभार मानले व प्रत्येक वार्डमध्ये स्थायी योगवर्ग घेण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्यास मोफत योगवर्ग घेण्याची ग्वाही दिली. योगसाधकांमधून संजय म्हापसेकर व डॉ. रोहिणी बांदेकर यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी पतंजली युवा भारत जिल्हा प्रभारी डॉ. प्रशांत परब, सोशल मीडिया जिल्हा प्रभारी योगेश येरम, जिल्हा युवती प्रभारी स्नेहल कडोलकर, भारत स्वाभिमान न्यास कुडाळ तालुका प्रभारी योगेश गवंडे, वेंगुर्ला तालुका प्रभारी संजय तेरेखोलकर, पतंजली योग समिती कुडाळ तालुका प्रभारी प्रमोद नाईक, वेंगुर्ला तालुका प्रभारी तातू नवार, सावंतवाडी तालुका सहप्रभारी नंदादीप केळूसकर, संघटनमंत्री रामकृष्ण धुरी, किसान सेवा समिती प्रभारी नारायण राणे, जेष्ठ योगशिक्षक दत्तारामकाका सडेकर व दिलीप भाईप, बंड्या सुकी, गोविंद सावंत, नंदकिशोर कोंडये, तालुका महिला महामंत्री प्रज्ञा चौगुले, संघटनमंत्री मृणाली गवंडे, कोषाध्यक्ष श्रद्धा सावंत, मीना सामंत, ॲडव्होकेट वर्षा गावकर, दिव्या चव्हाण, वर्षा बांदेकर, संजीवनी शिरसाट, अपर्णा भाईप, ऐश्वर्या सावंत तसेच योगसाधक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतंजली जिल्हा युवती प्रभारी स्नेहल कडोलकर यांनी तर प्रास्ताविक विकास गोवेकर यांनी केले. शेवटी पतंजली योग समिती तालुका प्रभारी बाबली गवंडे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा