You are currently viewing सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे हनुमंत गडावर शिवजन्मोत्सव साजरा

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे हनुमंत गडावर शिवजन्मोत्सव साजरा

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे हनुमंत गडावर शिवजन्मोत्सव साजरा

दोडामार्ग
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सिंधुदुर्ग विभागातर्फे दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी येथील हनुमंत गड येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
देवळातील देव आणि माऊलीच्या कपाळावरील कुंकू अबाधित राखणाऱ्या स्वराज्याच्या संकल्पनेचे अधिष्ठाता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण ठेवत हा उत्सव साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने गडपूजन, शिवप्रतिमा पूजन व दुर्गसंवर्धनाचा संकल्प करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी सर्व दुर्गसेवक, शिवप्रेमी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
#अधिकृत_पोस्ट – SPHMSMV 62/18022026
घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा 🚩

प्रतिक्रिया व्यक्त करा