*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मी रोज एक नवीन कविता वाचली*
साहित्य क्षेत्रात काव्य प्रकारात
नवकवींची विचार श्रृंखला
उदयास आली
जुन्यातूनच नव उत्पत्तीची
नव विचारांची नवकाव्ये
उदयास आली
अन् मी रोज एक नवीन कविता वाचली
जुन्या काव्य प्रकारांची
कुठेतरी वाट खुंटली
हायकू मुक्तछंद हजल गझल
अनेक नवप्रकारेन
नवकाव्ये उदयास आली
अन् मी रोज एक नवीन कविता वाचली
सणवार जयंती पुण्यतिथी
विकृत प्राकृत अर्थहीन बोबडी
ज्याला कळते त्याने ही लिहिली
ज्यासी न कळे त्याने ही लिहिली
विचार स्वातंत्र्याची मांदियाळी आली
अफाट अचाट नव विचारांची
नवकाव्ये उदयास आली
अन् मी रोज एक नवीन कविता वाचली
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७६.
