*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रेमाची सोबत…!*
जीवनाच्या वाटेवर चालताना
थकलेल्या क्षणी उबदार लाभते,
अंधार उजळून हास्याच्या एका क्षणात
मनाला आधार निरंतर सोबत देते..
वादळे येता,स्वप्ने कधी कोसळता
हातात हात आशेने धरते,
हरवलेल्या दिशांना नवी वाट मिळत
विश्वासाचा दीप पेटवत ठेवते..
अबोल्याही अर्थ कळतो क्षणोक्षणी
मौनातही भावांची सोबत उमटते,
डोळ्यांतून वाहत समजुतीची नदी
नात्याला अंतरातून शांत करते..
यशाच्या शिखरावर उभे असताना
अहंकाराला झुगारून देते,
अपयशातही न झुकू देणारी मान
स्वाभिमान सोबतीने खरा जपते..
दिवस उजळो वा रात्रही वाढो
वेळेच्या पलीकडे टिकून राहते,
सुख-दुःखाच्या दोलायमान क्षणी
सजग सोबत समतोल शिकवते..
शेवटची पायरी दिसे जरी दूरवर
हातात हात देऊन नेणारी सोबत,
प्रेम म्हणजे हक्क नव्हे, समजून
आयुष्यभर साथ देणारी प्रेमाची सोबत..
सौ.प्रज्ञा घोडके, चिंचवड, पुणे©®
