*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हसरी… कबर ..माझी…!!*
माझं जगणं
माझचं राहू द्या
हातभर अंतर
माझ्यापासून राहू द्या ..
अंतरातही अभिमान असतो
अभिमानांतही अंतर असते
अंतर असं पुसता येत नाही
त्याची काळवेळ ठरवली जाते
अंतरातच …सन्मान असतो
अहंकाराला इथे मुळीचं जागा नाही
कधीच ते …समजावून ही
कलंदर मुशाफिरीला समजत नाही
उष्टे खाणा-यांना पंगतीला
मला..बसवता येत नाही
स्वाभिमानाला अहंकाराची झळ
लागलेली मला सहन होत नाही
मोकळ्या ..शुध्द हवेत
श्वास …मला घेवू द्या
सुंदर जगण्याचा हव्यास
माझा… पूर्ण होवू द्या
माझा जिवनपट …कुणाला
कळला नाही तरी चालेल
माझ्या कबरीवर
जिंदगानी नक्कीच हसेल..
माझ्या कबरीवर…
जिंदगानी नक्कीच हसेल..!!
बाबा ठाकूर
