माजी नगराध्यक्ष सन्माननीय बबनराव वाढदिवसाच्या आपल्याला अनंत शुभेच्छा – प्रा. शैलेश नाईक
सावंतवाडी
एक परोपकारी, चारित्र्यसंपन्न, निष्कलंक, विनयशील, निरंकारी, सात्विक आणि धार्मिक वृत्तीच एक अलौकिक व्यक्तिमत्त्व म्हणून समाजात आपली ओळख आहे.
राजकारणापेक्षा समाजकारण करणारी माणसं आता फार थोडी राहिली आहेत त्यामध्ये आपली गणना केली जाते. अशा व्यक्ती आज समाजामध्ये अभावानेच आढळतात.
साळगावकर हे एक निष्कलंक नगराध्यक्ष व्यक्तिमत्व म्हणून पूर्ण जिल्ह्यात परिचित आहे. आठ वर्ष नगराध्यक्ष म्हणून त्यांनी सावंतवाडी नगरपरिषदेचा अगदी यशस्वीरित्या कार्यभार सांभाळला भ्रष्टाचाराला वाव न देता कर्जमुक्त सावंतवाडी नगरपरिषद व स्वच्छ व सुंदर सावंतवाडी म्हणून त्यांनी सावंतवाडी शहराला एक नवीन ओळख मिळवली. नगरपरिषदेतील कर्मचारी हेच माझं कुटुंब असं म्हणून त्यांनी प्रत्येकाशी आदराने सौजन्याने प्रेमाची वागणूक दिली. यावेळी ते नगर परिषदेमध्ये यावे असे प्रत्येकाला वाटत होते हेच त्यांच्यावरचे प्रेम आणि विश्वास सगळं काही सांगून जात.
खरंच माणूस म्हणून आपण ग्रेट आहात. आपली नगराध्यक्ष पदाची सुवर्णमयी कारकीर्द अजूनही जनतेच्या स्मरणात घर करून राहिली आहे. आपला मोठा मित्र परिवार पाहिला की, आयुष्य जगायला फक्त पैसेच लागत नाहीत तर त्यासाठी उत्तम आरोग्य, नात्यांमध्ये प्रेम आणि मैत्र निभावणारे मित्र असावे लागतात याची साक्ष पटते. अशा अजातशत्रू असणारे आमच्या परममित्र यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आपल्याला उदंड, निरोगी, निरामय दीर्घायुष्य लाभू दे अशी श्री देव पाटेकर चरणी प्रार्थना.
