You are currently viewing दर्पणकार बाळशास्त्री जाभेंकरांनी आदर्श पत्रकारतेचा पाया रचला – आर.जे.पवार

दर्पणकार बाळशास्त्री जाभेंकरांनी आदर्श पत्रकारतेचा पाया रचला – आर.जे.पवार

कणकवलीत जांभेकरांची जयंती साजरी, वृत्तपत्र विक्रेत्यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान…

कणकवली

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेले होते.त्यानी १९३२ समाज प्रबोधन करण्यासाठी दर्पण हे वृत्तपत्र सुरु केले.त्या दर्पणच्या पहिल्या अंकापासून समाजात असणा-या चालीरिती,जुन्या परंपरा याबाबत वेगवेगळ्या सदरातून प्रबोधन केले.त्यांनी सुरु केलेला वृत्तपत्रातून समाज प्रबोधनाचे काम कणकवली तालुक्यातील सर्व पत्रकार करत आहेत.त्यामुळेच वृत्तपत्र वाचूनच आमच्या दिवसाची सुरुवात होत आहे.दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारतेचा पाया रचला,त्यामुळेच समाजभिमुख पत्रकारीता होत असल्याचे प्रतिपादन कणकवली तहसिलदार आर. जे. पवार यांनी केले.
कणकवली तालुका पत्रकार संघ व कणकवली तहसिलदार कार्यालय यांच्या संयुक्त विदयमाने कणकवली तहसिल कार्यालय येथे बाळशास्त्री जांभेकर जयंती व वृत्तपत्र विक्रेते कोरोना योध्दा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्य़क्रमात प्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस कणकवली तहसिलदार यांच्या हस्ते अर्पण करत सर्व पत्रकारांनी अभिवादन केले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष संतोष वायंगणकर, कणकवली तालुका पत्रकार संघ अध्यक्ष भगवान लोके, जेष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश जोगळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुधीर राणे, सचिव नितीन सावंत, खजिनदार माणिक सावंत, माजी तालुकाध्यक्ष संतोष राऊळ, लक्ष्मीकांत भावे, चंद्रशेखर देसाई, संजय राणे, तुषार सावंत, अनिकेत उचले, योगेश गोडवे, उमेश बुचडे, विनोद जाधव, ओंकार ढवण, तसेच महसूल विभागाचे तरेळे मंडळ अधिकारी मंगेश यादव, तलाठी दिलीप पाटील, बाजीराव काशीद, महसूल सहाय्यक एस. आर. सुर्यवंशी, एम. के. आव्हाड, राजेश शिरवलकर, मंडल अधिकारी विदया जाधव, कोतवाल समीर राणे, श्री. लांबर, श्री. जाधव, शिपाई शंकर धुरी, पी. आर. मेस्त्री, शांताराम तुळसकर आदी पत्रकार व महसूल कर्मचारी उपस्थित होते.
संतोष वायंगणकर म्हणाले, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी महान कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्याचा नवोदित पत्रकारांनी आदर्श घ्यावा या कार्यक्रमात जयंती साजरी होत असताना वृत्तपत्र विक्रेत्यांचा होणारा सन्मान हा चांगला योगायोग आहे.
अशोक करंबळेकर म्हणाले, महाराष्ट्र सरकारने २० फेब्रुवारीला बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती शासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. त्यांमुळे बाळशास्त्री जांभेकर यांचे कार्य सर्वदूर पोहोचणार आहे. कणकवली तहसिलदार व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी कमी वेळेत चांगला कार्यक्रम आयोजित केला.
प्रास्ताविकात भगवान लोके म्हणाले, मराठी पत्रकार परिषद व पत्रकार संघाच्या पाठपुराव्य़ामुळे शासकीय कार्यालयांमध्ये बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी होत असल्याचा आनंद आहे. या निमित्ताने आम्ही कोरोना महामारीत वृत्तपत्र विक्रेत्यांनी स्वताच्या जिवाची पर्वा न करता काम केलं. त्याबद्दल प्राथनिधीक स्वरुपात पाच जेष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा कोरोना योध्दा पुरस्कार देऊन पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात वृत्तपत्र विक्रेते चंद्रकांत राणे, नारायण धुरी, दिवाकर चिंदरकर, संतोष पिळणकर, रमेश सावंत यांना शाल , श्रीफळ सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या कोरोना योध्दा विशेष सन्मान बाळशास्त्री जांभेकर दिनाचे औचित्य साधुन मान्यवरांच्य़ा हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार सचिव नितीन सावंत यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा