You are currently viewing सावंतवाडीच्या नारायण सावंत यांची किमान वेतन महामंडळ आयोगावर जिल्हा समन्वयकपदी निवड

सावंतवाडीच्या नारायण सावंत यांची किमान वेतन महामंडळ आयोगावर जिल्हा समन्वयकपदी निवड

उदयनराजे यांच्या विश्वासातील भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते; गुरुकुल येथे बबन साळगावकर यांच्याकडून सत्कार

सावंतवाडी :

सावंतवाडीतील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण सावंत यांची किमान वेतन महामंडळ आयोगावर जिल्हा समन्वयक म्हणून निवड झाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. सामाजिक जाणिवेतून सातत्याने कार्य करणारे आणि उदयनराजे यांच्या विश्वासातील व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख आहे. भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणूनही त्यांनी आपली स्वतंत्र छाप निर्माण केली आहे.

नियुक्तीनंतर गुरुकुल येथे त्यांचा छोटेखानी सत्कार सोहळा पार पडला. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन नारायण सावंत यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील कामगार व कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नवनिर्वाचित नगरसेवक आनंद नेवगी यांच्यासह गुरुकुल व राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे कार्यकर्ते बंड्या तोरस्कर, दिलीप पवार, अभय पंडित, मनोज घाटकर, उमेश खटावकर, शिवम सावंत, अशोक पेडणेकर, मयूर लाखे, इप्तिकार राजगुरू, कादर गवंडी, धीरज गावडे आणि रवी जाधव उपस्थित होते.

नारायण सावंत यांच्या निवडीमुळे सावंतवाडीतील सामाजिक व राजकीय क्षेत्रात नवी ऊर्जा संचारली असून, कामगारांच्या प्रश्नांवर अधिक ठोस आणि प्रभावी काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा