You are currently viewing सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,वेंगुर्ला येथे बालोद्यानचे उद्घाटन

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,वेंगुर्ला येथे बालोद्यानचे उद्घाटन

*सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,वेंगुर्ला येथे बालोद्यानचे उद्घाटन*

वेंगुर्ला

वेंगुर्ला रामघाट रोड येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुंदर असे बालोद्यान उभारण्यात आले असून सिंधुदुर्ग विद्यानिकेतनचे उपाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या हस्ते बालोद्यानचे उद्घाटन करण्यात आले. या बालोद्यानात झोपाळा,घसरगुंडी, मेरी गो राऊंड, क्लायम्बर, सी हाॅर्स राॅकर, सीसाॅ इत्यादी खेळणी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बालोद्यानाच्या उद्घाटन समारंभाला शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच शिक्षक पालक संघाचे शैलेश नार्वेकर, अनंत घाटकर, अमोल पेडणेकर, गौरी प्रभूखानोलकर,इशा मोंडकर,राधिका सपकाळ, श्रीया सावंत इत्यादी उपस्थित होते. या बालोद्यानाचा आराखडा तसेच या बालोद्यानाचे पूर्ण काम सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पालक असलेल्या आर्किटेक्ट गौरी प्रभूखानोलकर यांनी आपल्या देखरेखीत पूर्ण करून घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा