सिंधुदुर्ग भाजपातर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
ओरोस :
सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यालय, ओरोस येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त (समर्पण दिवस) त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, मंडल अध्यक्ष भाई सावंत, लोरन्स मान्येकर, छोटू पारकर, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, आबा मुंज, पंचायत समिती सदस्य अमित भोगले, नितीन महाडेश्वर, श्रावणी तेरसे तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचा व विचारांचा आढावा घेण्यात आला. त्यांच्या एकात्म मानवतावादाच्या तत्त्वज्ञानाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
