You are currently viewing स्मरणशक्ती विकास हा उपक्रम सर्वत्र राबविणार 

स्मरणशक्ती विकास हा उपक्रम सर्वत्र राबविणार 

मा.लेडी गव्हर्नर कमलताई गवईंचा पुढाकार

 

अमरावतीचे सुपुत्र व पुणे येथे गेल्या पंचवीस वर्षापासून स्थायिक झालेले सुप्रसिद्ध संमोहन तज्ञ व स्मरणशक्ती विकास हा कार्यक्रम संपूर्ण भारतात राबविणारे डॉ प्रवीण कुमार शेंडे यांचा स्मरणशक्ती विकास हा उपक्रम अतिशय चांगला असून स्व. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित सर्व महाविद्यालयांमध्ये व इतर शाखांमध्ये राबविण्याचा निर्णय सुप्रसिद्ध समाजसेविका व मा. लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ. कमलताई गवई यांनी जाहीर केला आहे. आज त्यांनी त्यांच्या काँग्रेसनगर स्थित कमलपुष्प या ठिकाणी पुण्यावरून आलेले डॉ.प्रवीणकुमार शेंडे यांचा शाल देऊन स्वागत केले व त्यांनी शिवजयंतीनिमित्त विविध महाविद्यालयांमध्ये तसेच विविध संस्थांमध्ये विनामूल्य स्मरणशक्ती विकास ताणतणाव निर्मूलन व संमोहन हे कार्यक्रम घेण्यास जो पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. डॉ.प्रवीणकुमार शेंडे यांचा कार्यक्रम यापूर्वी अमरावतीच्या तक्षशिला महाविद्यालयात संपन्न झाला असून त्या कार्यक्रमाला स्वतः मा.लेडी गव्हर्नर कमलताई गवई हया उपस्थित होत्या. हा उपक्रम अतिशय चांगला असून इतरही संस्थांनी आमच्या ट्रस्टने जसा पुढाकार घेतला तसा पुढाकार घेऊन आपापल्या संस्थांमध्ये हा उपक्रम राबवावा असेही आवाहन त्यांनी केले. स्व. दादासाहेब चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्राचार्य डॉ. कमलाकर पायस यांच्यावर त्यांनी पुढील नियोजनाची जबाबदारी दिली असून डॉ.प्रवीणकुमार शेंडे यांचे कार्यक्रम ट्रस्टच्या विविध ठिकाणी संपन्न होणार आहेत. याप्रसंगी मिशन आय ए ए.चे संचालक प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी शिवजयंतीनिमित्त पुढाकार घेऊन डॉ.शेंडे यांना निमंत्रित करून त्यांचे नागपूर व अमरावती विभागात ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. याप्रसंगी डॉ. कमलताई गवई यांनी डॉ.शेंडे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या या उपक्रमात सहभागी होण्यास संमती दिली आहे. डॉ. शेंडे यांचे कार्यक्रम भारतात ठिकठिकाणी झाले असून त्यांनी आतापर्यंत अनेकांना स्मरणशक्ती विकास या उपक्रमाचा लाभ करून दिला आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम राबविताना ते कुठल्याही प्रकारचे मानधन प्रवास खर्च आकारणार नाहीत असेही त्यांनी डॉ.कमलताई गवई यांना सांगितले आहे. त्याबद्दल त्यांनी डॉ.शेंडे यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या या उपक्रमास शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत.

 

प्रकाशनार्थ

डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा