You are currently viewing बरं झालं देवा, तू मला समजून घेतोस

बरं झालं देवा, तू मला समजून घेतोस

बरं झालं देवा, तू मला समजून घेतोस

बरं झाल देवा!🙏🏻

बरं झालं देवा! तू एकटा
मला सदा समजून घेतोस!

देव्हाऱ्यात माझ्या तू
सिंहासनात बसतोस
नजर मात्र सदा
आम्हावर ठेवतोस
बरं झालं देवा……1

कितीवेळा रोजच्या घाईत
तू पारोसा राहतोस
अबोल राहून मात्र
खूप सांगून जातोस
बरं झालं देवा……2

नेहमीच तुला रे
गार पाण्याची अंघोळ
तरीही ब्र शब्दाने तू मला
काहीचं कधी म्हणत नाहीस
बरं झालं देवा….3

चकचक अंघोळ घालताना
संध्यापात्रात हातून माझ्या
तू घसरतोस, पडतोस
तरी तू,रोज मला सावरतोस
बरं झालं देवा….4

कपाळा ऐवजी तुझ्या
मुकुटालाच गंध,कुंकू,लावते
तरी सुद्धा तू गप्प असतोस
बरं झालं देवा….5

दूध साखरेच्या नैवेद्यावरचं
तुझं रोज पोट भरते
सणवारीच तुला मिष्टान्न मिळते
तरी नेहमी हसतोस
बरं झालं देवा….6

संध्याकाळी कधी कधी
सांजवात मी विसरते
कधी उशिराही लावते
अंधारातही तरी तू राहतोस
बरं झालं देवा……7

कितीतरी वेळा तुला मी
घरीच ठेऊन जाते
तरी एकटा तू माझ्या
राखण,घराची करतोस!
बरं झालं देवा…8

भाव भक्तीचाचं तू
भुकेलेला असतोस
माझे किती अपराध
सहन तू करतोस!
बरं झालं देवा….9

दोन हातांच्या नमस्काराने
तू समाधानी होतोस
किती वेळा माझे गाऱ्हाणे
शांतपणे ऐकतोस!
बरं झालं देवा….10

माझ्या आयुष्यात तू
काहीच कमी नाही केलंस
वेळोवेळी हात धरून
पुढं पुढं तू नेतोयस
बरं झालं देवा…..11

कितीवेळा तुझ्यावर मी
रागे भरले बरं कां
तरी तू मात्र तुझा आशिष
सदैव पाठीशी ठेवतोस
बरं झालं देवा….12

तुला माहित आहे कां देवा
तू किती वैभव दिलेस?
सोन्यासारखी संपन्नता
मुलंरुपी समृद्धी देऊन..
‘वास्तूसुखात’ तू मला
किती सुखात ठेवले आहेस!
बरं झालं देवा…..13

नजर ना लागो
माझ्या या संसारास
हेचं मागणे आहे!
पिढ्यानंपिढ्या सुस्वास्थ्य
उत्कर्ष देण्यास विसरू नकोस!
ऐकतो आहेस ना!देवा!ऐकतोयेस………..
बरं झालं देवा…..14

 

सौ. रोहिणी अशोक गंधेवार. अकोला
——————————

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*Admission Open…..Admission Open*

*🎓 G.N.M. नर्सिंग प्रवेश 2026–27 सुरू 🎓*

*यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, रत्नागिरी येथे नर्सिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी.*

*✅ 12 वी परीक्षापूर्वी GNM अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची सुवर्णसंधी*

*✅ 3 वर्षांचा G.N.M. नर्सिंग अभ्यासक्रम*

*✅ इंडियन नर्सिंग कौन्सिल व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त*

*✅ शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती सुविधा उपलब्ध*

*✅ अनुभवी प्राध्यापक वर्ग व उत्तम शैक्षणिक वातावरण*

*✅ आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंग व प्रॅक्टिकल एक्सपोजर*

*✅ अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ₹35,000 ते ₹40,000 पर्यंत पगाराची नोकरी मिळवण्याची संधी*

*✅ 100% प्लेसमेंट असिस्टन्स*

*📍 पत्ता: मिरजोळे रोड, MIDC, एअरपोर्ट जवळ, रत्नागिरी*

*📞 संपर्क: 8600302454 / 9423291863 / 8830789570*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/195145/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा