*काव्यप्रेमी महाराष्ट्र साहित्य समूहाचे सन्मा. लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सावल्या*
गेल्या कलत सावल्या
गेलं अंबर झाकाळूनं
आठवणीची मनं लाटं
लाट उसळे परतूनं
जातं धुळीत माखले
घरदार कोसळले
तुळशी वृंदावन माय
भेगा चिऱ्यात निखळले
मन धावते भेटावया
वर आभाळ फाटले
निवडुंगाच्या काट्यावर
तन मन रक्ताळले.
वडं कोसळला बाप
माय सावली निखळली
भाऊ-बहीण मागे मागे
आनंतातं लुप्त झाली.
हुंदक्या मागून हुंदके
आसवाणी दिली वाटं
परतुनी मायबापा
झाली भावंडाची ताटातूटं
भूमिपुत्र वाघ
😢😢😢😢
