पंचायत समिती चिंदर मतदारसंघातून दीपक सुर्वे विजयी
मालवण / चिंदर :
जिल्हा परिषद आचरा मतदारसंघात महायुतीने बाजी मारली असून पंचायत समिती चिंदर मतदारसंघातून भाजपचे दीपक सुर्वे यांनी विजय मिळवला आहे. त्यांना १४४५ मते मिळाली. निकाल जाहीर होताच समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला.
