*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुलाब फुल*
————————–
अजून मनाला
देतं भूल
वहीतलं सुकलं
गुलाब फुल
मऊ, रेशमी
रंगीत संगीत
झंकारते त्यातून
तुझेच गीत
किती संध्याकाळ
सजल्या धजल्या
खोल मनात
खूप रुजल्या
बहर संपला
रंग उतरले
नशिबाने मात्र
खूप फिरवले
चूरली फुले
विरल्या राती
गात्रे अजून
गाणे गाती
कोमेजल्या तरी
पाकळ्या अजून
का ठेवल्यास.
वहीत जपून?
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित
9130861304
