*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जय गजानन महाराज*
गण गण गणांत बोते
आजच्या दिनी प्रकटले
महाराज श्री गजानन,
शेगांवीचे भाग्य उजळे
कृपासिंधू कारुण्यघन/१/
आशीर्वाद असता देवा
कृपा तुझीच आम्हावरी,
गण गण गणांत बोते
मंत्र जप प्रत्येक घरी/२/
मनुदेही ईश्वरावतार
साधे सोज्वळ रुप जरी,
अंतर्यामी वात्सल्य प्रेम
निस्पृह ममतेच्या सरी/३/
शांत भाव वदनावरी
प्रसन्नचित्त समाधानी,
दुसर् यांचे दु:ख शिरी
स्मितहास्य आनंदघनी/४/
तव दर्शने होती भक्त
पावन, संकटमोचनी,
शरण येऊनी दर्शना
नतमस्तक त्वचरणी/५/
सहज सोप्या जनसेवा
परमार्थ जाणून करी,
प्रिय तो देवा सेवाभाव
कृपादृष्टांत भक्तांवरी/६/
तुझीच कृपा गजानना
सौख्य शांतीत समाधान,
तुझिया दर्शन सानिध्यात
सेवेत ,मी व्हावे विलिन/७/
🙏🌹🙏
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
कला शिक्षिका
PC# मयुरी सतीश आंबेतकर
