You are currently viewing आंगणेवाडीत बचत गटांच्या उत्पादित मालाचे भव्य प्रदर्शन व विक्री

आंगणेवाडीत बचत गटांच्या उत्पादित मालाचे भव्य प्रदर्शन व विक्री

८ फेब्रुवारी रोजी मा. ना. नितेश राणे यांच्या हस्ते श्री देवी भराडी जत्रोत्सवात उद्घाटन

 

मालवण / (प्रतिनिधी) :

आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ मत्स्य व बंदरे विकास मंत्री, महाराष्ट्र शासन तथा तज्ञ संचालक नितेश राणे यांच्या हस्ते रविवार दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता श्री देवी भराडी मंदिराजवळ, आंगणेवाडी येथे होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून निलेश राणे (आमदार) उपस्थित राहणार असून, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक संदीप परब, व्हीक्टर डान्टस, मेघनाथ धुरी, नाबार्डच्या जिल्हा प्रबंधक श्रीम. दिपाली माळी, आंगणेवाडी विकास समितीचे अध्यक्ष सतीश आंगणे, नितीन काळे (जिल्हा समन्वयक अधिकारी – मावीम), वैभव पवार (व्यवस्थापक – जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद), सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास आंगणेवाडी व देउळवाडा गावातील ग्रामस्थांनी, यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी तसेच जिल्हा बँकेचे तालुकास्तरीय विकास अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.

सदर बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री दि. ०८ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा