*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जातीय .. पसारा…!!*
होत.. माहित मला
बोभाटा तर …होणारचं
जातीला.. जाग येता
गाव तर …पेटणारचं..
अर्धवट जळालेल्या माणुसकीनं
जातीद्वेषांत ….घर जळणारचं
संवेदना …मुक्यानेचं मेली
पिसाटलेले बेदरकार वागणारचं..
पसारा जातीचा ..रक्तांत
नुसता बुजगावण्याचा धाक
त्वेष-द्वेषांत …..रक्त सांडलं
पापपुण्यांत संस्कृतीची राख
मुक्या.. मेलेल्या ..जातीला
धार …निळ्या उमेदीची
नसे फिक्या रडण्याला
जाणीव डंखाच्या उमाळ्यांची..!
मिसुरडं फुटलं जातीला
जगणं ..झालं ..मरणं
प्रेमातही सल.. पापांची
मुक्याने मेलं …जगणं..!!
जातीला जाग येता
गाव तर जळणारचं
पसारा जातीचा रक्तातचं
द्वेषांत रक्त सांडणारचं..!
बाबा ठाकूर
