You are currently viewing स्वप्नातलं माझं गाव

स्वप्नातलं माझं गाव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*स्वप्नातलं माझं गाव*

 

निसर्गाच्या सानिध्यातलं

इवलं माझं गाव

गावाजवळून वाहे नदी

शिडात शोभे नाव

 

पुर्वेला टेकड्या आडून

सुर्य डोकावतो

सांजवेळी तलावात

प्रतिबिंब दाखवितो

 

उत्तरेला माळरानी

गुरे चरती

दक्षिणेला नजर टाकता

शेतीच शेती

 

टेकडी वरून वाहे

फेसाळ धबधबा

किल्यावर शोभून दिसे

महालाचा गाभा

 

गावाच्या एका बाजूला

असे कौलारू शाळा

आजूबाजूला मंदिरात

भरे भक्तांचा मेळा

 

पानं फुले फळे बहरती

झाडी घनदाट

चिमण्या पाखरांचा

ऐकू येई किलबिलाट

 

शेतांमधून नागमोडी

जाते गाडवाट

खळखळ वाहे पाटाचं पाणी

विहिरीला मोट अन् रहाट

 

जाती निहाय गल्ल्या

परि एकमेकां प्रेमभाव

गुण्यागोविंदाने राही

रंक आणि राव

 

असं सुरेख गाव माझं

त्याचा नाही ठाव

पहाटेचं कोंबडं आरवलं

स्वप्नात पाहिला गाव….

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७३७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा