*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दृष्टांत अनामिकाचा*
〰️〰️〰️〰️〰️〰️
वसा गंधळण्याचा उरात असावा
ऋतूऋतूंना सदैव बहर येत रहावा
जगण्याचे मनसुबे सुखात उमलावे
श्वासांना या जन्माचा अर्थ कळावा
रंगरूप सभोवारी सारेच चैतन्याचे
तो वारसा प्रीतस्पर्शात रमुनी जावा
जे जे भोगले ते ते सारे सुख मानूनी
गतजन्माचा हिशोब चुकता करावा
ओंजळीत कवटाळता क्षणाक्षणांना
अंतरात अनामिकाचा दृष्टांत व्हावा
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*वि.ग.सातपुते.(भावकवी)*
