मिरज / प्रतिनिधी :
पुणे येथे झालेल्या ओपन तायक्वांदो चॅम्पियनशीप स्पर्धेत मिरज येथील विश्व तायक्वांदो अकॅडमीचे खेळाडू स्वराज रणवीर नलवडे याने ४१ किलो वजनाखाली आणि कु.ईश्वरी रणवीर नलवडे हीने २० किलो वजनाखाली चांगली कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
दोघा नलवडे भाऊ – बहिणीने मिळवलेल्या या यशाने मिरज शहराच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.त्यांना प्रशिक्षक डॉ.संकेत कांबळे यांचे मार्गदर्शन आणि आई , वडील व कुटूंबाचे प्रोत्साहन लाभले.या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
