You are currently viewing मालवण तालुक्यात पंचायत समिती व जि.प. निवडणुकीत महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण तालुक्यात पंचायत समिती व जि.प. निवडणुकीत महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण तालुक्यात पंचायत समिती व जि.प. निवडणुकीत महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण :

मालवण तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा प्रचार गावागावात जोरात सुरू असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. वराड पंचायत समिती व पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
वराड पंचायत समिती मतदारसंघात भाजपा महायुतीच्या उमेदवार माधुरी मोहन मसुरकर या विजयी होतील, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. तसेच पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना महायुतीचे उमेदवार व माजी जि.प. वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनाही मोठे मताधिक्य मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
खासदार नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे व आमदार दिपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती एकसंघपणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवत आहे. शिवसेना व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकदिलाने प्रचारात सहभागी झाले आहेत.
महायुती सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासनिधी उपलब्ध होऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, असा विश्वास मतदारांमध्ये वाढत असून त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा वाढताना दिसत आहे.
वराड पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार माधुरी मसुरकर या सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून गाव व मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांची तळमळ परिचित आहे. निधी मिळवून विकासकामे मार्गी लावण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात.
“जनतेची सेवा करणे आणि जास्तीत जास्त निधी आणून संपूर्ण मतदारसंघाचा विकास करणे हेच आमचे ध्येय आहे. आदर्श मतदारसंघ घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू,” असे मत माधुरी मसुरकर यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा