You are currently viewing असते काळजी परमेश्वराला

असते काळजी परमेश्वराला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*असते काळजी परमेश्वराला*

 

श्रवणभक्तीचा भक्षून प्रसाद

परत केला *ज्याचा त्याला*

असली जरी कमतरता दृष्टीची

ईश्वरानै आहे तोल सांभाळला…

1

कळतो प्रतिसाद हसण्यातून

नाही मिळाले जरी दृष्टी सुख

काम नाही हे येरागबाळ्याचे

व्हायला लागते *अंतर्मुख*……

2

अदमासाने *ऐकून सारे*

आवाज काढतो *हुबेहुब*

देणगी नव्हे ही आहे वरदान

कठीण आहे जमणे लकब…..

3

देऊन *दृष्टी* उणी तयाला

नकलेने काढली त्याची कसर

वरदानाचा ठेऊन “वरदहस्त”

दिली श्राव्यशक्तीतून *नजर*….

4

असते काळजी *परमेश्वराला*

करतो समतोल आपले आपण

नाही लागत *मोर्चा सत्याग्रह*

ठेवत नाही कसले *अधुरेपण*

5

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा