You are currently viewing प्रेमभाषा

प्रेमभाषा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”प्रेमभाषा”*

 

प्रेमाची भाषा असते सरळ सुजाण

येई आपसुक होऊन निर्मळपणं।।धृ ।।

 

कधी कुणा कशावर जडते प्रेम

स्थळ काळ वेळ काही नसते बंधन

येई उत्स्फूर्त उत्कट हृदयापासून।।1।।

 

येते सागर लाटे सम उचंबळून

घेई भरारी कधी विहंगा प्रमाणं

येते मुक्या भावनांना शब्द रूप लेऊन।।2।।

 

उठती तरंग व्यक्त होती नेत्रांतून

फुटे प्रेम पाझर भारावती नयन

होई आनंदोत्सव प्रसस्वती शब्दधन।।3।।

 

भाव होई व्यक्त विसरे भूक तहान

साठवाव्या अंतरी आठवणी जपून

सत्य शिवम् सुंदर दावी दिव्य ज्ञान।।4।।

 

प्रेम आदरे उठती आनंद तरंग

प्रेमाला नाही उपमा निधान प्रमाण

ते भगवंताचे देणं असते आंदण।।5।।

 

असते सुमन फुलपाखरां प्रमाण

उडती अलवार घेती मध चाखून

बहुरंगी फुलांना स्पर्शती नजाकतेनं।।6।।

 

कृष्णाची बासरी प्रेम प्रतीक मधु धून

गहिवरती मेघ नभी जाती बरसून

प्रेमांत देव रमतो प्रेम मौल्यवान।।7।।

©️कवी.श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677

प्रतिक्रिया व्यक्त करा