कोकण इतिहास परिषदेचे सदस्य डॉ. संजीव लिंगवत यांचे प्रतिपादन
वेंगुर्ला
छत्रपती शिवाजी राजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र राज्यातील व सिंधुदुर्ग सह प्रत्येक किल्ला म्हणजे शिवरायांचे जागते स्मारक आहे. नवयु्कांमध्ये शिवचरित्र अभ्यास जागवून या किल्ल्यांचे संवर्धन व संरक्षण केल्यास भविष्यात वारसा व संस्कृती मजबूत होईल, असे प्रतिपादन कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लोकनेते अँड. दत्ता पाटील होमिओपॅथी मेडिकल काँलेज येथे कोकण इतिहास परिषदेचे सदस्य व जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी वेंगुर्ला येथे केले.
वेंगुर्ला होमिओपॅथी मेडिकल काँलेजमध्ये आयोजित शिवजयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. लिंगवत बोलत होते. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन काँलेजचे प्राचार्य डॉ. के.जी केळकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले. तसेच शिवगर्जना, विविध नाट्याविष्कार, पोवाडे, नृत्याविष्कार सादर करत शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला डॉ.मनोज आरोस्कर, डॉ. पुजा कर्पे, डॉ.सई लिंगवत ,डॉ. सोनाली सावंत, डॉ.सतिश पाटील उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमात दुर्गेश पाटील, परेश नांदोस्कर, उमेश प्रभु, ओकार नार्वेकर, अंकुश कोढिलकर, अंशुल कावढे, श्वेता खरात, प्रियांका जगताप, नितेश जयस्वाल, सर्जील करंजकर,अनिकेत निब्रे, महादेव परब, पराग नाडकर्णी, स्नेहा तिडके, स्नेहा कदम, मनाली शिवलकर, स्नेहा कदम, स्नेहा चव्हाण, निलम नाईक, तेजस राऊळ, वैभव सिंग, अजय वर्मा यांनी सहभाग दर्शविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुर्गश पाटील, स्वागत परेश नांदोस्कर यांनी तर सुत्रसंचालन अदिती पवार यांनी केले.