पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत वेर्ले व कलंबिस्त परिसरातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्ते भाजपात दाखल
सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना (उबाठा) पक्षाचे कलंबिस्त पंचायत समिती उपविभाग प्रमुख तथा वेर्ले गावचे सुपुत्र दिलीप भाई राऊळ यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे उबाठा सेनेला तालुक्यात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
या वेळी उबाठा सेनेतील युवासेना शाखाप्रमुख, माजी शाखाप्रमुख, सोसायटी संचालक व विविध जबाबदारीवर कार्यरत असलेले अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व भाजपात त्यांचे सहर्ष स्वागत असल्याचे सांगितले.
पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये विठ्ठल राऊळ, माजी पोलीस पाटील अरुण लिंगवत, वेर्ले शाखाप्रमुख अविनाश राऊळ, संजय राऊळ (माजी शाखाप्रमुख), सिताराम राऊळ, मनोज राऊळ (माजी ग्रामपंचायत सदस्य), प्रमोद चव्हाण, सत्यवान लिंगवत, हरी लिंगवत, पंढरी बिडये, काका राऊळ, दीपक राऊळ, तानाजी राऊळ, अजित राऊळ (युवासेना शाखाप्रमुख), तुकाराम नाईक (सोसायटी संचालक), विजय राऊळ, चिन्मय जडये, बाळकृष्ण घाडी, महादेव राऊळ, नंदू राऊळ, धीरज राऊळ, शैलेश राऊळ, मुन्ना राऊळ, दीप्ती राऊळ (माजी ग्रामपंचायत सदस्य), दर्शना राऊळ, शिवानी राऊळ, दिलीप शेट्ये, दत्तप्रसाद राऊळ, शशिकांत राऊळ, अक्षय राऊळ, अनंत राऊळ, दीप्ती राऊळ, दिनेश राऊळ, गोविंद राऊळ, किसन राऊळ, संदीप नाईक, लक्ष्मण कदम, शशी नाईक, मोहन कदम, सुभाष कदम, सुनील कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.
या प्रसंगी जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगांवकर, आंबोली मंडल उपाध्यक्ष किरण सावंत, सुभाष राऊळ, आंबोली युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पास्ते, वेर्ले शक्ती केंद्र प्रमुख भगवान राणे, बुथ अध्यक्ष प्रसाद गावडे, गाव कमिटी अध्यक्ष सुनील राऊळ, बुथ प्रमुख राजन राणे, कलंबिस्त उपसरपंच सुरेश पास्ते, प्रल्हाद तावडे, महेश सावंत, बुथ अध्यक्ष नामदेव पास्ते, ओवळीये बुथ अध्यक्ष सागर सावंत आदी भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
