मतदान बहिष्काराच्या इशाऱ्यानंतर रस्त्याचे काम सुरू; फोंडाघाट हवेली नगर रस्त्याचे 500 मीटर काम आज पूर्ण
फोंडाघाट :
फोंडाघाट हवेली नगर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांनी मतदान बहिष्काराचा इशारा दिल्याची बातमी ‘संवाद मीडिया’वर प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) उप नेते श्री. संजय आग्रे यांनी तत्काळ दखल घेत रस्त्याचे काम सुरू केले.
आज सकाळपासून सुरू करण्यात आलेल्या या कामामुळे सायंकाळपर्यंत सुमारे 500 मीटर रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांनी शिवसेना उप नेते संजय आग्रे यांना आशीर्वाद दिले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी आपल्या मित्राला शुभेच्छा देत रस्ता उत्तम दर्जाचा झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच सरपंच आग्रे मॅडम व शिवसेना (शिंदे गट) उप नेते संजय आग्रे यांचे अभिनंदन करत त्यांनी लोकांच्या समस्या तत्काळ सोडविल्याबद्दल प्रशंसा केली.
या रस्त्यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा सुलभ होणार असून, परिसराच्या विकासाला चालना मिळेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
