You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या ‘ कु. हिना जासिम सारंग ‘ हिला विभागस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उत्तुंग यश

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या ‘ कु. हिना जासिम सारंग ‘ हिला विभागस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उत्तुंग यश

**स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या ‘ कु. हिना जासिम सारंग ‘ हिला विभागस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उत्तुंग यश :**

सावंतवाडी

कोल्हापूर येथे मंगळवार, दि. २७ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या कोल्हापूर विभाग पॉवरलिफ्टिंग असोसिएशन तर्फे आयोजित शालेय विभागीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या ‘ कु. हिना जासिम सारंग ‘ हिने ४० किलो वजनी गट स्पर्धेत ५५ किलोचे वजन उचलून द्वितीय क्रमांकाचे स्थान पटकावले. तसेच कु. हिना सारंग हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून तिच्या पालकांनी, प्रशिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी व शाळेचे संचालक श्री. रूजुल पाटणकर तसेच मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी देखील खूप कौतुक केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा