*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.कविता किरण वालावलकर लिखित भावस्पर्शी काव्यरचना*
*अजित पवार*
विकासाचा बाणा त्यांचा
विकासाचा ध्यास मनी
स्पष्टवक्तेपणा सदा
तेज यशाचे जीवनी
भान वेळेचे कायम
असे धडाका कामाचा
सार्थ केला हेतू त्यांनी
घेतलेल्या निर्णयाचा
प्रशासनी कारभार
सडेतोड राहिलेला
प्रगतीच्या पावलात
कार्यकाळ जिंकलेला
नेहमीच धावलेले
महाराष्ट्र हितासाठी
नाव अजित दादांचे
ठाम जनतेच्या पाठी
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी , कर्नाटक
