You are currently viewing आपल्याला मात्र मरावं लागतं

आपल्याला मात्र मरावं लागतं

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री वैशाली अभिजीत न्यायनिर्गुणे लिखित भावस्पर्शी रचना*

 

*आपल्याला मात्र मरावं लागतं*

 

मलाही प्रश्न पडला… जिवंतपणी माझी कोणालाच काही किंमत नव्हती l

मी केलेल्या कर्तुत्वाची कोणालाही जाणीव नव्हती l

मग ठरवलं काहीतरी करून दाखवायचं l

माझं नाव जगासमोर यायला स्वतःला आता झोकून द्यायचं ll

 

मग मी विचार केला.. जनतेसाठी मी केल्या चाकऱ्या l

मिळाल्या त्यांना पोटभर भाकऱ्या l

वाटलं कुठेतरी मी कमी पडलोय l

जनतेस काहीतरी देण्याचे मी उरलोय ll

 

पण नंतर मग उमगलं… स्वतःबद्दलची स्तुती ऐकायलाही आपला प्राण गेलेला लागतो l

केलेल्या कर्तुत्वाची माहिती कळायलाही

आपल्याला मात्र मरावं लागतं ll

 

मग मात्र दिवस पालटतो… मेलेला दिवस खूप महत्त्वाचा वाटतो

मित्र शत्रू सगळे एकत्र येतात

सगळेजण मग आपली स्तुती करत असतात l

टीव्हीवर मग आपलीच बातमी l

दोन-तीन दिवस असते मजाच पत्रकारांची ll

 

लोकांचाही पहा कसं असतं… जिवंत असताना कोणीही आपली करत नाही स्तूती l

चांगले काम केले तरी

समजतात आपणास दोषी l

जीव गेल्यावर मग लागते रांगच रांग l

चांगली होती ती व्यक्ती असा देतात सगळेच राग ll

 

किती असते ते दुर्भाग्य आपलं…जेव्हा जनता एक होऊन

आपल्या नावाने काहीतरी अर्पण करते l

त्याचा आनंदही आपण घेऊ शकत नाही l

मेल्यावरच का त्याचं महत्त्व पटतं हे मात्र कळत नाही ll

 

वाटते विचारायला मग… जिवंत असताना काय तुम्हाला लाज वाटते की काय ?

दाद द्यायलाही स्तुतीबद्दल जीभ झडते की काय ?

 

 

म्हणूनच आता असं वाटतं …आता तरी जागे व्हा

जिवंतपणे द्यायला मान l

लागा आता कामाला

ज्यांचं आहे भरपूर नाव ll

 

किती लाजिरवाणी गोष्ट आहे …

आपण आपला बहुमान स्वीकारायलाही आपल्याला मात्र मारावे लागतं l

लोकांना कळायला आपले कर्तुत्व आपले जीव प्राण आपण हरवलेलं असतं !!

 

वैशाली अभिजीत न्यायनिर्गुणे, मुलुंड पूर्व,

810 838 1524

प्रतिक्रिया व्यक्त करा