You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी श्रमसंस्कार शिबिर कारीवडे येथे.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी श्रमसंस्कार शिबिर कारीवडे येथे.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी श्रमसंस्कार शिबिर कारीवडे येथे.

राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते उद्घाटन.

श्रमदानाचे महत्व फार मोठे आहे.
श्रम करणारा कधीच बेकार रहात नाही………
राजेसाहेब खेमसावंत भोंसले

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ७ दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिर 22 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीमध्ये कारिवडे येथे आयोजित केले आहे. या निवासी
श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते
दिपप्रज्वलनाने करण्यात आले , याप्रसंगी संस्थेचे कार्यकारीणी सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,सहसंचालक अॅड.शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल.भारमल, कारीवडे गावच्या सरपंच सौ आरती माळकर ,उपसरपंच श्री महेश गावकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक माळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल कारीवडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष शैलेश मेस्री , ज्येष्ठ ग्रामस्थ लक्ष्मण सावंत,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.निकीता पास्ते , राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. यु..सी पाटील ,डॉ.सौ. सुनयना जाधव, प्रा.एम.बी.बर्गे,प्रा. आर,बी सावंत, प्रा. एम व्ही भिसे, महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. यू.सी. पाटील यांनी केले , महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ डी.एल.भारमल यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक माळकर यांनी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर हे कारीवडे गावात होत असल्याने त्यांनी राजघराण्याचे विशेष आभार मानले.कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की आपण श्रमदानातून या गावातील स्वच्छता ,आरोग्य विषयक जनजागृती ,शेती बंधारे यासाठी लोकांना मदत करा व महाविद्यालयाचे नाव सदैव लोकांच्या स्मरणात राहील असे काम करा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.वैदेही सावंत हिने केले तर आभार कु. नेहा ठाकूर हिने मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा