*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मन ढगाळ ढगाळ….*
मन ढगाळ ढगाळ,
जसे थंडीत आभाळ !
येता अकल्पित काळ ,
कशी आली ही अवेळ!…१
मौसम असे थंडीचा,
जो धुक्यातून प्रकटे!
निसर्गाचे हे वर्तन,
मना अघटित वाटे !…२
आठव येई सख्याचा,
ज्याची संगत ती न्यारी!
दूरदेशी गेला सखा ,
भेट पुन्हा ना संसारी!…३
अशा या गूढ हवेत,
मन कातर कातर!
काही भूतकाळ खुणा,
मना विसर विसर!…४
उज्वला सहस्रबुध्दे, पुणे
