You are currently viewing कणकवलीतील महायुतीची प्रचार सभा रद्द

कणकवलीतील महायुतीची प्रचार सभा रद्द

अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय कार्यक्रम स्थगित

कणकवली :

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारी महायुतीची जाहीर प्रचार सभा रद्द करण्यात आली आहे.

आज सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. कणकवली येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार होते. मात्र अजित पवार यांच्या निधनामुळे सर्व राजकीय कार्यक्रम तातडीने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणारी ही सभा रद्द झाल्याची माहिती स्थानिक प्रशासन आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या घटनेमुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या नेत्याला गमावल्याच्या भावनेने महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि कार्यकर्ते दुःखात बुडाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा