You are currently viewing आसोली गावातून भाजपाचा बिनविरोध विजय; संकेत धुरी यांचा वेंगुर्लेत सत्कार

आसोली गावातून भाजपाचा बिनविरोध विजय; संकेत धुरी यांचा वेंगुर्लेत सत्कार

वेंगुर्ले :

जि.प. व प.स. निवडणुकीत वेंगुर्ले तालुक्यातुन भाजपा चे बिनविरोध विजयी खाते खोलणारे आसोली पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार संकेत धुरी यांचा सत्कार भाजपा वेंगुर्ले च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, मंडल अध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, उभादांडा जि.प.मतदार संघाचे उमेदवार मनवेल फर्नांडिस, नगरसेविका गौरी मराठे, अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, बुथप्रमुख नामदेव सरमळकर, संजय मळगावकर, आनंद मेस्त्री, शैलेश नार्वेकर, सिताराम साळगावकर (बबी), ग्रा.पं.सदस्य राकेश धुरी, संतोष सावंत, मारुती दोडशानट्टी, अर्जुन तांडेल, प्रितम सावंत, संदेश धुरी, सिरिल आल्मेडा, अरॉन फर्नांडिस, इनासिन फर्नांडिस, देवेंद्र डिचोलकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा