You are currently viewing प्राणघातक हल्ला प्रकरणात आरोपीस जामीन

प्राणघातक हल्ला प्रकरणात आरोपीस जामीन

प्राणघातक हल्ला प्रकरणात आरोपीस जामीन

ऍड. अश्फाक शेख यांचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस :

सावंतवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२४४/२०२५ अन्वये दाखल प्राणघातक हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी तल्हा अंजुम राजगुरु (उर्फ मोहम्मद तल्हा अंजुम राजगुरु) यास ओरोस येथील मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी रुपये ५०,०००/- च्या जामिनावर तसेच अटी शर्थींवर सशर्त मुक्तता मंजूर केली आहे.

4.75 कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारावरून सावंतवाडी येथे फिर्यादी व त्यांच्या मित्रांवर कारने ठोकर देऊन जखमी करणे तसेच वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप आरोपीवर होता. या प्रकरणात आरोपीस दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी अटक करून प्रथम पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली होती.

दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीच्या वतीने दाखल जामीन अर्जावरील युक्तिवाद अॅड. अशपाक शेख यांनी मांडला. न्यायालयाने सदर युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस जामीन मंजूर केला. या प्रकरणात अॅड. नामदेव मठकर, अॅड. पंकज खरवडे, अॅड. विनय रजपूत व ॲड. कैस शेख यांनी सहाय्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा