You are currently viewing जि.प.–पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 28 जानेवारीला कणकवलीत महायुतीची जाहीर सभा

जि.प.–पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 28 जानेवारीला कणकवलीत महायुतीची जाहीर सभा

जि.प.–पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 28 जानेवारीला कणकवलीत महायुतीची जाहीर सभा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात सभा; पोलिसांकडून स्थळाची पाहणी पूर्ण

कणकवली

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची भव्य जाहीर सभा मंगळवार, 28 जानेवारी रोजी सायंकाळी कणकवली येथे होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात पार पडणार असून, त्यासाठीचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.
एकीकडे मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा धडाका सुरू असतानाच, निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असल्याने या सभेत ते काय भूमिका मांडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
या जाहीर सभेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने आज उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानाची पाहणी करून सुरक्षा व नियोजनाचा आढावा घेतला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी सभास्थळी भेट देत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, शिवसेना तालुकाप्रमुख दामोदर सावंत, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा