You are currently viewing शब्द माझे..मर्मबंधनातील..!!

शब्द माझे..मर्मबंधनातील..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शब्द माझे..मर्मबंधनातील..!!*

 

शब्दाला कवटाळण्यात तसा

फारसा अर्थ…नसतो

भावनांचा पदर उलगडताचं..तो

जख्खम्हातारा दिसायला लागतो

 

पोलादी मक्तेदारीचा…दणका

माझ्याच शब्दांनी..मला दिला

परिपूर्णतेचा खोटा अट्टहास

सदैव माझ्यासोबत..धरला

 

वेदना..विद्रोह…नकार

माझ्या शब्दांना..मान्य नाही

जाती धर्माचा वर्चस्ववाद

छुपे पशुत्व…कबूल नाही

 

मर्मभेद करणा-या कलाकारीने

विझलेली गुणवत्ता जागवली

महामहिमांची कचखाऊ मनमानी

माझ्यात …ठासून भरली..

 

करार सदैव..सोबतीचा..शब्दांनी

एकदाचा करून… टाकला

चातुर्याने ..शहाणं करून

मर्मभेद करणारा कलाकार जागवला

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा