तिची कमी आयुष्यात,
खूप काही शिकवून जाते.
रोजचेच कांदेपोहे देखील,
बेचव करून टाकते.
ती असते सोबत,
दिवस अन रात्र.
कधी येते मिठीत तर,
कधी मन मोहून टाकते.
तिचा श्वास माझ्या,
श्वासात मिसळून जातो.
अंतरीची दुःख तिच्या,
मी हळूच पिऊन घेतो.
समर्पण तिचं केवळ,
दिखावा कधीच नसतो.
अंतर्बाह्य मुक्तपणे देह,
बाहुत येऊन विसावतो.
भाबडा चेहरा तिचा,
अनेक प्रश्न विचारतो.
मुक्या प्रश्नांची उत्तरे मी,
उसण्या हसण्यानेच देतो.
दूर कुठेही जाताना ती,
माझा निरोप घेऊन जाते.
जड आवाजात माझ्यापाशी,
आपली काळजी ठेऊन देते.
तिला माहिती काळजात,
तिची जागा काय आहे.
अंतरीचा श्वास माझा,
केवळ तिच्यासाठीच वाहे.
एक एक आठवण तिची,
काळजात रुतून राहते.
आठवणींच्या पावसात,
काळीज रक्ताने न्हाऊन जाते.
…..रक्ताने न्हाऊन जाते….
(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६