बेकायदा गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी तळवडे येथील एकावर गुन्हा दाखल
२१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
बांदा :
बेकायदा गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी तळवडे येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत आरोपीकडून २१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संतोष बाबाजी चव्हाण (वय ४४, रा. तळवडे-खेरवाडी) असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई काल रात्री साडेनऊच्या सुमारास लकरकोट, बांदा येथे करण्यात आली.
बांदा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. छाप्यात संतोष चव्हाण याच्याकडून गोवा बनावटीची दारू आढळून आली. याप्रकरणी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई एस. यू. गवस व हवालदार धर्णे यांनी केली असून पुढील तपास बांदा पोलीस करीत आहेत.
