*बांदा येथे गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षा सुरळीत पार*
*बांदा*
शालेय वयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची ओढ निर्माण व्हावी यासाठी गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात येणारी राज्यस्तरीय गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षा पीएमश्री बांदा नं.१ केंद्र शाळेत सुरळीत पार पडली. पहिली ते आठवी इयत्तेतील मराठी,सेमी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती .बांदा केंद्र शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, उपाध्यक्षा संपदा सिध्दये, जे.डी.पाटील, शिक्षिका रेणूका परब ,प्रतिभा घोटगे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. राज्यभर होणारी ही परीक्षा सुरळीत पार पाडल्याबद्दल गुरूकुल सोसायटी चे अध्यक्ष किरण चौगुले यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
