You are currently viewing समाजभान
Oplus_16908288

समाजभान

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

समाजभान

 

ऋण हे समाजाचे, फेडावयाचे आहे

नाते माणुसकीचे, जोडावयाचे आहे||१||

 

जगाकडून घेतो किती, मोजता ही न येते

काहीतरी जगाला पण, द्यावयाचे आहे ||२||

 

केवळ विचार स्वतःचा, प्राणीही करत राहतो

स्वार्थाचे हे कुंपण, तोडावयाचे आहे||३||

 

दुःखात दुसऱ्याच्या, व्हावे आपण सहभागी

अश्रू कुणाचे तरी, पुसावयाचे आहे || ४||

 

जसा उन्हात वृक्ष, देतो सर्वांना छाया

तसेच आपण आता, जगावयाचे आहे || ५||

 

अंधार या जगी जो, अज्ञान- भेदावयाचा

ज्ञानाचे दीप तिथे, लावावयाचे आहे ||६||

 

नकोत फक्त वाटा, हव्या आहेत सेवा

कर्तव्य आपले हे, स्मरावयाचे आहे ||७||

 

‘मी’ पणा विसरून, व्हावे आता ‘आपण’

समाजभान मनी, जागवायचे आहे ||८||

 

सौ .स्नेहा धोंडू नारिंगणेकर

शिरोडा ,सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा