You are currently viewing पतंग

पतंग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पतंग*

 

ती उंच आकाशी उडत होती

स्वच्छंदी विहार करत होती

जरी नियंत्रण एका धाग्याचे

मनमुराद आनंद लुटत होती

 

इकडून तिकडे तिकडून इकडे

जिकडे नेई हवा तिकडे डोलत होती

हवेच्या अलगद स्पर्शाचा

आस्वाद घेत होती

मधेच वारा देई धक्का

फडफड थरथर कापत होती

 

काही वेळाने

कुठून तरी आली पतंग दुसरी

वेगाने पुढे जात होती

क्षणात विसरून आनंद सारे

मग तीही स्पर्धेत उतरली होती

 

पळापळा कोण पुढे पळतो

झुंज त्यांच्यात जुंपली होती

कुठेतरी धागा निघाला कच्चा

साथ त्याने सोडली होती

 

आता ती कटली होती

सैरभैर झाली होती

वाट मिळेल तिकडे भटकत होती

कधी उंच-उंच तर कधी

खाली-खाली उतरत होती

 

शेवटी झाडाच्या एका

शेंड्याला लटकली होती

त्या झाडाखाली माणसांची

चढाओढ लागली होती

 

दोन पैशाची पतंग लुटण्यात

त्यांच्यातही स्पर्धा लागली होती

त्यांच्या त्या झटापटीत

तिची मात्र

अंत्ययात्रा निघाली होती …

अंत्ययात्रा निघाली होती…

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

8208667477.

7588318543.

प्रतिक्रिया व्यक्त करा