You are currently viewing वैभववाडीत मनसेला मोठा धक्का; अध्यक्ष महेश कदम यांचा भाजपात जाहीर प्रवेश

वैभववाडीत मनसेला मोठा धक्का; अध्यक्ष महेश कदम यांचा भाजपात जाहीर प्रवेश

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत प्रवेश; मनसेची संघटना खिळखिळी

वैभववाडी :

वैभववाडी तालुक्यात मनसेला मोठा धक्का बसला असून, वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश उर्फ भैय्या कदम यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

हा प्रवेश सोहळा कणकवली येथील ओम गणेश बंगला येथे जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. महेश कदम यांच्या प्रवेशामुळे वैभववाडीतील मनसेची संघटना पूर्णतः खिळखिळी झाली असून, मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनसे कार्यकर्ते संजय चव्हाण, गणेश गुरव, चंदन पाटणे, बबन डकरे, राजेंद्र गुरव, संतोष गुरव, बबन शिंगरे, सुरेश कदम, शांताराम कोलते, अशोक कदम, अरुणा कोलते, अरुण कोलते, अवनी कदम, राजन कदम, अमोल कोलते, वनिता लाड, सुगंधा पोवार, मनीषा मनवे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

महेश उर्फ भैय्या कदम हे करुळ गावचे सुपुत्र असून त्यांनी यापूर्वी उपसरपंच म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी शिवशभो संघटनेत कार्याध्यक्ष तसेच वैभववाडी टेम्पो संघटनेत उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे.

यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक माजी संचालक दिगंबर पाटील, शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश सावंत, सरपंच नरेंद्र कोलते, बूथ अध्यक्ष दीपक लाड तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा