You are currently viewing सिंधुदुर्गची संस्कृती आणि आदरातिथ्याने भारावले सत्यजित तांबे..

सिंधुदुर्गची संस्कृती आणि आदरातिथ्याने भारावले सत्यजित तांबे..

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारा प्रत्येकजण जिल्ह्याच्या सौंदर्याच्या आणि जिल्हावासीयांच्या आदरातिथ्याच्या प्रेमात पडतो. काहीशी अशीच गोष्ट घडली ती सत्यजित तांबे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जिल्ह्याच्या बांदा सिमेवर स्वागत केले. त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, शंभूराजे देसाई, ब्रिजदत्त, शिवराज मोरे, साक्षी वंजारी आदी पदाधिकारी होते.


कोकणात कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी आले आणि मासे खाल्ले नाहीत असं होतंच नाही. ठरलेले सर्व कार्यक्रम आटोपून दुपारी जेवणासाठी सर्व मंडळी बाळा गावडे यांच्या घरी गेले. बाळा गावडेंच्या ८० वर्षे वयाच्या आईने माश्यांचे छान जेवण घातले. त्यामुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या आदरातिथ्याने सत्यजित तांबे भारावून गेले. बाळा गावडे यांचा मुलगा देखील काँग्रेस पक्षाचे काम करत असून त्यांची पत्नी नामवंत वकील असल्याचे त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची संस्कृतीच आहे आलेल्या पाहुण्यांचे यथोचित स्वागत करणे. पुढील कार्यक्रमासाठी देवगडाला प्रस्थान करताना बाळा गावडे यांच्या आईकडून आशीर्वाद घेत सत्यजित तांबे यांनी रात्रीच्या जेवणाचा आस्वाद देवगड येथे किरण टेंबुलकर यांच्या घरी घेतले. आणि जिल्ह्याचा निरोप घेताना मात्र त्यांनी जिह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा