You are currently viewing कुडाळ–मालवण तालुक्यात माघी गणेश जयंती उत्सवांना माजी आमदार वैभव नाईक यांची भेट

कुडाळ–मालवण तालुक्यात माघी गणेश जयंती उत्सवांना माजी आमदार वैभव नाईक यांची भेट

कुडाळ–मालवण तालुक्यात माघी गणेश जयंती उत्सवांना माजी आमदार वैभव नाईक यांची भेट

कुडाळ

कुडाळ–मालवण तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या माघी गणेश जयंती उत्सवांना माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी तालुक्यातील अनेक गणेश मंडळांना सदिच्छा दिल्या.
माघी गणेश जयंतीनिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, विविध मंडळांच्या वतीने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवांना भेट देताना माजी आमदार वैभव नाईक यांनी गणेशभक्तांशी संवाद साधला व मंडळांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी संबंधित श्री गणेश मंडळांच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. समाजात एकोपा, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे कार्य गणेशोत्सवाच्या माध्यमातून होत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने तालुक्यातील विविध भागांत उत्साहाचे वातावरण असून, भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित राहत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा