शेखर सुभेदार मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम स्वच्छ व सुंदर भटवाडी एक पाऊल स्वच्छतेकडे.
सावंतवाडी
शेखर सुभेदार मित्र मंडळ व भटवाडी ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने भटवाडीतील स्वच्छतेसाठी विविध ठिकाणी स्वच्छता विषयक सूचनाफलक लावून स्वच्छ व सुंदर भटवाडी हा संदेश देऊन भटवाडी येथील नागरिकांना निरोगी आरोग्य मिळण्यासाठी हा उपक्रम मंडळामार्फत राबवण्यात येत आहे ढोरे पानंद, चंद्रभागा तळी, कोळंबेकर परिसर व विद्यालय व शैक्षणिक व धार्मिक स्थळे या ठिकाणी कोणीही कचरा किंवा चालत्या गाडीतून कचऱ्याच्या पिशव्या टाकताना आढळला तर तो परिसर त्या व्यक्तीकडून स्वच्छ करून घेतला जाईल असा ग्रामस्थानी ठराव मांडला आहे या ठरवायचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
